'VFX कौतुक पुरे! अभिनय कधी करणार?' करण जोहरचा बॉलिवूड कलाकारांना टोला; 'रामायण'च्या चर्चेदरम्यान वक्तव्य व्हायरल

KARAN JOHAR REACTS TO ACTORS INTERFERING IN CASTING AND VFX BUDGETS: बॉलिवूडमधील काही कलाकार अभिनयापेक्षा VFX बजेट, कास्टिंग आणि बॉक्स ऑफिसच्या गणितातच जास्त रस घेतात का? प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरने कलाकारांच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करत 'तुम्ही अभिनय कधी करणार?' असा खोचक सवाल केला आहे.
KARAN JOHAR

KARAN JOHAR

esakal

Updated on: 

KARAN JOHAR PRAISES SHAH RUKH KHAN AND AMITABH BACHCHAN'S EXPERIENCE: सध्या रामायण सिनेमाची सगळीकडे चर्चा रंगताना पहायला मिळतेय. सिनेमातील VFX चं प्रत्येक जण कौतूक करताना पहायला मिळतय. दरम्यान सध्या बॉलिवूडमध्ये सिनेमांपेक्षा कलाकरांच मानधन, बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि सिनेमाच्या भव्यतेबाबत जास्त चर्चा होताना पहायला मिळतेय. दरम्यान अशातच दिग्दर्शक, निर्माता करण जोहरने बॉलिवूडमधील काही कलाकरांच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केलीय. कलाकारांनी केवळ आपल्या अभिनयावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी चित्रपटाच्या निर्मितीमधील प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करू नये, असं मत त्याने व्यक्त केलं आहे.

Loading content, please wait...