

karan johar twins
esakal
बॉलिवूडचा स्टार दिग्दर्शक करण जोहर सध्या चर्चेत आहे. करणने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले. जितकी चर्चा त्याच्या हिट चित्रपटांची झाली तितकीच चर्चा त्याच्या फ्लॉप चित्रपटांचीदेखील झाली. त्याचं मोठं कारण म्हणजे त्याने नेपोकिड्सना दिलेली संधी. नेपोकिड्समुळे करण कायम चर्चेत असतो. मात्र आता करण एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. करणने पहिल्यांदाच त्याच्या जुळ्या मुलांना कॅमेरासमोर आणलंय. त्याच्या मुलांना पाहीन नेटकरी चकीत झालेत. करणला नेटकरी इतर वेळेस कितीही ट्रोल करत असले त्याच्या मुलांच्या एका कृतीने नेटकऱ्यांची मनं मात्र जिंकली आहेत.