Jennifer Winget Karan Singh Grover Will Come Together: 'मिले जब हम तुम' मालिकेमुळे करण सिंग ग्रोव्हर आणि जेनिफर विंगेट यांनी चाहत्यांच्या मनात राज्य केलं होतं. आज देखील लोक अरमान आणि रिद्धिमा यांचे चाहते आहेत. त्याकाळी करण सिंग आणि जेनिफर हे चाहत्यांसाठी आदर्श जोडपं होतं. परंतु काही कारणामुळे दोघांचा घटस्फोट झाला. ११ वर्षापासून दोघांनी घटस्फोट घेतला आणि ते परत कधीच एकत्र दिसले नाही. परंतु आता अनेक वर्षानंतर एका मालिकेद्वारे दोघे पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा रंगतीय.