मुंबई / कोल्हापूर : हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टायलिश अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor) जरी ग्लॅमरच्या झगमगाटात असली तरी आपल्या मातीशी नाळ कशी टिकवून ठेवावी, हे तिने केलेल्या एका वक्तव्यावरून दिसून येत आहे. तिने ‘सॉरी, प्राडाची नाही... ही ओजी (ओरिजनल) कोल्हापुरी आहे’, अशा शब्दांत सोशल मीडियावर कोल्हापुरी चप्पलचे (Kolhapuri Chappal) कौतुक करत स्थानिक हस्तकलेला मान दिला.