
Bollywood Entertainment News : अभिनेत्री कतरीना कैफ आता फक्त अभिनेत्री म्हणून तर कौशल कुटूंबाची लाडकी सून म्हणूनही प्रसिद्ध झालीये. तिचा विकीच्या कुटूंबाबरोबर असलेला बॉण्ड त्यांचे व्हायरल होणारे व्हिडीओज सगळेचजण पसंत करतात. विकीच्या आईबरोबर तिने महाकुंभला लावलेली हजेरी असो किंवा त्यांचं एकत्र सण साजरं करणं असो तिच्या या व्हायरल व्हिडीओजवरून ती संसारी स्त्री झालीये हे स्पष्ट समजत. नुकताच तिचा एका लग्नातील व्हिडीओ व्हायरल होतोय.