

katrina kaif
ESAKAL
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. कतरीनाने काही महिन्यांपूर्वीच चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये ती आई झालीये. आणि प्रसूतीनंतर स्त्रीच्या शरीरात होणारे बदल कतरिनाच्या शरीरातही झाले. बाळाला जन्म दिल्यानंतर अभिनेत्रीचं वजन वाढलं. मात्र त्यावरून तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलंय. तिला बॉडी शेमिंग करण्यात आलं. मात्र अनेक बॉलिवूड कलाकार तिच्या बाजूने उभे राहिले. आता कतरिनाने स्वतः बाळ झाल्यानंतर तिची जीवन शैली कशी असते याबद्दल सांगितलं आहे.