Katrina Kaif Pregnant Age
esakal
बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध कपल कटरिना कैफ आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा बनणार आहेत. अभिनेत्री कॅटरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक गोंडस फोटो शेअर करत प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांना दिलीय. या फोटोमध्ये तिचा बेबी बंप दिसून येत आहे. सध्या कॅटरिना कैफ 42 वर्षाची आहे. 40 वर्षानंतर बाळ जन्माला घालणं फार कठीण असतं. यावेळी महिलेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वयाच्या 40 नंतर प्रेग्नेंसीसाठी डॉक्टर सुद्धा नकार देतात. कारण सध्याच्या काळात बाहेरच खाण-पिणं आणि लाईफस्टाईल यामुळे महिलेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.