kbc kid controversy
esakal
अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपतीची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा होताना पहायला मिळत आहे. या शोमध्ये एका लहान मुलाने उद्धटपणे बीग बींसोबतचा संवाद साधला. त्यानंतर त्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर त्या मुलाला प्रचंड ट्रोल करण्यात आलंय. या शोमध्ये एक लहान मुलगा इशित भट्ट अमिताभ यांच्यासमोर हॉटसीटवर बसला होता. परंतु त्याचं अमिताभ बच्चन यांच्यासोबतच वागणं आणि बोलणं अत्यंत वाईट होतं. त्यांच्या उर्मट बोलण्यामुळे त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. परंतु ईशान हा पहिला मुलगा नाहीतर याआधी सुद्धा केबीसीमध्ये असा मुलगा येऊन गेलाय, जो अतिहाणपणामुळे खेळातून बाद झालाय.