

kbc 18
esakal
कौन बनेगा करोडपती' चा १८ वा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. इथे स्पर्धक आपली स्वप्न घेऊन येतात. पैसे जिंकण्यासोबतच हॉट सीटवर बसून अमिताभ बच्चन यांच्यासोबत बोलणं हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखं आहे. त्यामुळेच यंदाचा १८ वा सीझनही चांगलाच गाजतोय. नुकतीच या कार्यक्रमात जूडो खेळाडू अस्मिता डे, शॉटपुट पॅरा-अॅथलीट शर्मिला धनखड, बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन आणि पॅरा पॉवरलिफ्टर झंडू कुमार यांनी हजेरी लावली होती. लव्हलिना आणि झंडू यांनी गेमच्या पहिल्या भागातील प्रश्नांची उत्तरं दिली तर अस्मिता आणि शर्मिला यांनी दुसऱ्या भागात प्रश्नांचा सामना केला. मात्र त्या महात्मा गांधीवरील एका प्रश्नाचं उत्तर देऊ शकल्या नाहीत.