बरोबर उत्तर देऊनही मराठमोळ्या भूषण ठाकरेला नाही मिळाले ७ कोटी; काय होतं कारण, 'हा' होता KBC चा शेवटचा प्रश्न

Bhushan Thakare KBC 18 Winner: मराठमोळा भूषण ठाकरे चक्क ७ कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहोचला होता. मात्र त्याने बरोबर उत्तर देऊनही त्याला ७ कोटी रुपये मिळालेले नाहीत.
bhushan thakre

bhushan thakre

esakal

Updated on: 

मिताभ बच्चन यांचा लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती १८’ सध्या चर्चेत आहे. या पर्वाला महाराष्ट्रातून एक खास करोडपती मिळाला आहे. जळगावचा रहिवासी असलेला भूषण ठाकरे याने आपल्या ज्ञानाच्या आणि संयमाच्या जोरावर तब्बल १ कोटी रुपये जिंकले आहेत. मात्र, ७ कोटींच्या अंतिम प्रश्नापर्यंत पोहोचल्यानंतर त्याने खेळातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, खेळ सोडल्यानंतर त्याने दिलेलं उत्तर अचूक ठरलं. म्हणजेच जर त्याने खेळ न सोडता प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर तो ७ कोटी जिंकला असता. त्यामुळे भूषणच्या या निर्णयाची आणि त्याच्या खेळाची चर्चा होत आहे.

Loading content, please wait...