
Sana Shinde: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha 2024 elections) पाचव्या टप्प्याचं मतदान काल पार पडलं. अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. अशातच काही ठिकाणी मतदान हे अतिशय धिम्या गतीनं सुरु आहे. ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. आता मतदान केल्यानंतर केदार शिंदे (Kedar Shinde) यांची मुलगी सना शिंदेनं (Sana Kedar Shinde) सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून सनानं चाहत्यांना सांगितलं की, ती मतदान करण्यासाठी चार तास रांगेत उभी होती. सनाच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सना शिंदेनं आई-वडिलांसोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "आज मला मतदानाचा सर्वात अनपेक्षित अनुभव आला. तेथे जवळपास 36 अंश सेल्सिअस तापमान होते. 4 तास घामाने भिजल्यानंतर अखेर मला मतदानाचा हक्क बजावता आला."
पवईतील हिरानंदानी येथील मतदार केंद्राच्या बाहेर मतदारांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. अनेक नागरिक तीन-चार तास रांगेत उभे होते. येथील EVM मशील बंद पडल्या होत्या. ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. सिनेअभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) देखील लाईनमध्ये उभे होते.या संपूर्ण घटनेवर आता आदेश बांदेकर यांनी एक व्हिडीओ शेअर करुन संताप व्यक्त केला आहे.
प्राजक्ता माळी, विशाखा सुभेदार, गौरव मोरे, स्पृहा जोशी,प्रशांत दामले, पुष्कर श्रोत्री, मिलिंद गुणाजी,स्वप्निल जोशी, मिलिंद गवळी,समीर चौघुले या कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.