

NAGRAJ MANJULE WIFE
ESAKAL
'फॅन्ड्री', 'सैराट' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांनंतर लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतीक्षित 'खाशाबा' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटात नागराज त्यांची जादू पुन्हा एकदा दाखवणार याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. त्यामुळेच प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजकडे डोळे लावून बसले होते. आता अखेर त्यांची प्रतीक्षा संपलीये. नागराज यांच्या 'खाशाबा' चा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. यात चित्रपटात दिसणाऱ्या अनेक कलाकारांचे चेहरे दाखवण्यात आलेत. १ जानेवारी २०२७ रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.यात दिग्दर्शक नागराज मंजुळेंची पत्नी देखील दिसलीये तुम्ही ओळखलंत का?