शर्ट काढून विवाहित अभिनेत्रीला मारली मिठी; सोडायला सांगूनही सोडेना, वर म्हणतो- किस करू का? भर कार्यक्रमात अभिनेत्याने ओलांडल्या मर्यादा

Khesari Lal Yadav Viral Video | Bhojpuri Actor's Onstage Behaviour With Ritu Singh Sparks Backlash: अभिनेत्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात त्याने एका अभिनेत्रीला मिठी मारलीये आणि किस करण्याबद्दल विचारतोय.
khesarilal yadav

khesarilal yadav

esakal

Updated on: 

भोजपुरी इंडस्ट्री ही आधीच त्यांच्या गाण्यांमुळे बदनाम आहे. त्यात काही चित्रपटातील सीन पाहून सर्वसामान्य प्रेक्षकही चकीत होतात. आता एका भोजपुरी अभिनेत्याने अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. लोकप्रिय भोजपुरी स्टार खेसारीलाल यादव भोजपुरी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचे चित्रपट प्रचंड गाजतात. मात्र सध्या खेसारीलाल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका इव्हेंटमध्ये खेसारीलालने एका विवाहित अभिनेत्रीला मिठी मारत चक्क सगळ्यांसमोरच किस करण्याची इच्छा व्यक्त केली. जे पाहून नेटकरी त्याला ट्रोल करत आहेत.

Loading content, please wait...