
Marathi News : मुघल क्रूर सम्राट औरंगजेबाच्या कबरीवरून पुन्हा एकदा महाराष्ट्र पेटलाय. ही कबर महाराष्ट्रातून हटवण्याची मागणी सत्ताधारी पक्ष करत आहेत. त्यावरूनच नागपूरमध्ये दंगल उसळली. दोन गटामध्ये झालेल्या वादाचं रूपांतर दंगलीत झालं आणि सध्या नागपूरमध्ये कर्फ्यू लागला आहे. या घटनेवर मराठी अभिनेत्याने भाष्य करत सरकारची पोलखोल केली.