Kota Factory season 3: आणखी वाढणार 'कोटा फॅक्टरी'तील मुलांचा स्ट्रगल, सीझन 3 च्या ट्रेलरची तुफान चर्चा

Kota Factory 3 trailer: 'कोटा फॅक्टरी' सीझन 3 चा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आणखी वाढणार 'कोटा फॅक्टरी'तील मुलांचा स्ट्रगल, सीझन ३च्या ट्रेलरची तुफान चर्चा
kota factory 3 trailer sakal

Kota Factory: नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक लोकप्रिय सीरिजपैकी एक असणाऱ्या 'कोटा फॅक्टरी' च्या पुढील सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर 'कोटा फॅक्टरी 3'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. पुन्हा एकदा यंग ऑडियन्ससाठी टीव्हीएफ एक वेगळा अनुभव घेऊन आला आहे. या सीझनमध्येही कोटामध्ये अभ्यास करणाऱ्या मुलांचा स्ट्रगल दाखवण्यात आला आहे. मात्र या सीझनमध्ये जितू भैया म्हणजेच जितेंद्र कुमारदेखील मुलांसोबत स्ट्रगल करताना दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणखी एक अनपेक्षित ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मुलं कशी स्वतःची स्वप्न खुंटीला टांगतात याचा प्रत्यय या सीझनमध्ये येणार आहे.

ट्रेलरची सुरुवातच जितू भैयाच्या मुलाखतीने होते. 'जीत की तयारी' या पॉडकास्टमध्ये जितू भैया हे मुलांसोबत सिलेक्शन प्रोसेसबद्दल बोलताना दिसत आहे. आता ती वेळ आली आहे जेव्हा वैभव, बालमुकुंद उर्फ मीना, उदय यांसारख्या कोटामध्ये आयआयटीची तयारी करणाऱ्या मुलांचा निकाल येणार आहे. त्यानंतर त्यांना प्लेसमेंट मिळवण्यासाठी धक्के खावे लागणार आहेत. याबद्दल जितू भैया सांगतात की, आपल्याला सक्सेसफुल सिलेक्शनसोबतच सक्सेसफुल तयारीदेखील करावी लागणार आहे. इथूनच आपल्याला याचा अंदाज येतो की जितू भैया पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार आहेत.

पाहा ट्रेलर:

यावेळेस 'कोटा फॅक्टरी ३' प्रेक्षकांसमोर सत्य ठेवणार आहेत जे सत्य प्रेक्षक जितू भैया यांच्या तोंडूनच ऐकणार आहेत. ते सत्य हे आहे की आयआयटीसाठी तयारी करत असलेली ही मुलं खरं तर फक्त १५- १६ वर्षांची मुलं आहेत. त्यांच्याही काही भावना आहेत, त्यांच्या काही सवयी आहेत. इथे मुलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सीरिजमध्ये नवीन आणि जुनी पात्र आहेत. आता यासगळ्यात कुणाची नाव पार होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना २० जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 'कोटा फॅक्टरी ३' २० जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com