

Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam Movie Song Out
esakal
Marathi Entertainment News : मराठी माध्यमातील शाळांची संस्कारमूल्ये, त्या शाळांनी घडवलेली पिढी आणि शिक्षकांनी दिलेला अमूल्य वारसा ही सगळी शाळेची माया पुन्हा अनुभवायला मिळणार आहे ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ या चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शाळा मराठी’ या धमाल गाण्यातून. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी 'क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी' असे म्हणत ‘द फोल्क आख्यान’ च्या हर्ष-विजय आणि ईश्वर सोबत पाच दमदार गाणी चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातील पहिले ‘शाळा मराठी’ हे शाळेची आठवण जागं करणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.