'छावा' चित्रपट प्रदर्शित झाला आणि लोकांनी त्याला अक्षरश: डोक्यावर घेतलं. लोकांनी चित्रपटासह विकीच्या अभिनयाचंही भरभरुन कौतूक केलं आहे. दरम्यान अभिनेता आणि सिनेसमीक्षक कमाल आर खानने छावा चित्रपटाचं समीक्षक करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तसंच त्याने विकिपीडियावर वादग्रस्त मजकूर शेअर करुन तो खरा असल्याचा दावा केला आहे.