विकी कौशल याच्या मुख्य भूमिकेत असलेला 'छावा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या 'छावा' चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. या चित्रपटातील 'आया रे तुफान' हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.