
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीला नाटकाची खूप मोठी परंपरा आहे. आजही अनेक व्यावसायिक नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येतात. मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार नाटकांमध्ये आवर्जून काम करत असतात. धर्मवीर सिनेमामुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता क्षितिश दाते आता पहिल्यांदाच नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.