Laapataa Ladies OTT Release: किरण रावचा 'लापता लेडीज' ओटीटीवर झाला रिलीज; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...

Laapataa Ladies OTT Release: 'लापता लेडीज' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. प्रेक्षक घरबसल्या हा चित्रपट पाहू शकता.
Laapataa Ladies OTT Release
Laapataa Ladies OTT Releaseesakal

Laapataa Ladies OTT Release: आमिर खान (Aamir Khan) निर्मित लपता लेडीज (Laapataa Ladies) या चित्रपटाचे दिग्दर्शन किरण रावनं (Kiran Rao) केलं आहे. 'लपता लेडीज' हा चित्रपट 1 मार्च रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. प्रेक्षक घरबसल्या हा चित्रपट पाहू शकता.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर झाला रिलीज?

'लपता लेडीज' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. याबाबत नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं, "ताजा खबर: लापता लेडीज मिल चुकी है! लापता लेडीज, नेटफ्लिक्सवर मध्यरात्री स्ट्रीम होत आहे." 25 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.

'लपता लेडीज' ची स्टार कास्ट

'लपता लेडीज' या चित्रपटात प्रतिभा रंता, नितांशी गोयल आणि स्पर्श श्रीवास्तव मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय रवी किशन, छाया कदम आणि दुर्गेश कुमार यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Laapataa Ladies OTT Release
Laapataa Ladies Collection Day 3 : पहिल्या तीन दिवसांत चार कोटींची कमाई! 'लापता लेडिज' 'हिट की फ्लॉप'?

13 वर्षांनी किरणने दिग्दर्शनात केलं कमबॅक

2011 मध्ये किरण रावनं दिग्दर्शित केलेला धोबी घाट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि तब्बल 13 वर्षांनी किरणने चित्रपट दिग्दर्शित कमबॅक केला. तिच्या 'लपता लेडीज' या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं.

लापता लेडिज चित्रपटाची कथा सूरजमुखी नावाच्या एका गावातील एका तरुणावर आधारित आहे. ज्याची बायको हरवते.

Laapataa Ladies OTT Release
Laaptaa Ladies Review : 'बायको हरवली म्हणून कुणी...' किरण रावचा 'लापता लेडिज' नेमकं काय सांगू पाहतोय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com