

Lagnacha Shot Marathi Movie Announced
esakal
Marathi Entertainment News : लग्न म्हणजे आनंद, उत्साह आणि तयारी… पण कधी कधी हाच आनंद गोंधळात बदलला तर? अशाच एका गोंधळावर आधारित ‘लग्नाचा शॉट’ हा चित्रपट ६ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले असून त्यातून चित्रपटाचा हलकाफुलका, मजेशीर मूड स्पष्टपणे दिसून येतो.