'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये मोठा ट्विस्ट; पार्थवर हल्ला, काव्याची स्मृती जाणार? प्रोमो पाहून नेटकरी म्हणतात- नाही यार...

LAGNANANTAR HOILACH PREM SHOCKING PROMO: 'लग्नानंतर होईलच प्रेम' चा नवा प्रोमो आता समोर आलाय ज्यात काव्याच्या डोक्याला मार लागलाय. आता पुढे काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
lagnantar hoilach prem new promo

lagnantar hoilach prem new promo

esakal

Updated on

छोट्या पडद्यावर सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका चांगलीच गाजतेय. या मालिकेने प्रेक्षकांना प्रेमात पाडलंय. टीआरपीमध्येही ही मालिका टॉप १० मध्ये आहे. आता या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत आहेत. हे कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतंय. पार्थ आणि काव्या यांची जोडी तर जुळली आहे. मात्र जिवा आणि नंदिनी यांच्या एक होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. जिवाने नंदिनीला घटस्फोटाचे पेपर दिलेत. आणि तिला सही करायला सांगितली आहे. तो तिला जबरदस्ती सह्या करायला सांगतो. तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या यांच्यावर हल्ला होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com