Lalit Prabhakar: 'प्रेमाची गोष्ट 2' मध्ये रोमँटिक अंदाजात दिसणार ललित, पोस्ट करत म्हणाला, 'मला एक गोष्ट सांगायची होती...'
Premachi Gosht 2: ललित प्रभाकर 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून घराघरात पोहचला. त्याचा आता 'प्रेमाची गोष्ट 2' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने या चित्रपटात अभिनय करत असल्याचं सागितलं आहे.
प्रेमाची गोष्ट या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दाखवली. अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे या कलाकारांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल आला असून या सिनेमाची घोषणा मकरसंक्रातीदिवशी करण्यात आली.