Hruta Durgule Reveals Lalit Prabhakar Doesn’t Use WhatsApp | Arpaar Movie Promotions
esakal
अभिनेता ललित प्रभाकर याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून ललितला नवी ओळख मिळाली. त्याने आदित्यच्या पात्रातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अनेक मुलींना आपला लाईफ पार्टनर आदित्यसारखा हवा असा वाटू लागला. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते झाले. दरम्यान अशातच आता ललित आणि हृताचा आरपार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी ललितबद्दल एक गोष्ट हृताने सगळ्यांसोबत शेअर केलीय.