

lalit prabhalar not getting married
esakal
मराठीसोबतच आता बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा ललित प्रभाकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आज. ललितने 'जुळून येति रेशीमगाठी' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यातील त्याचा आदित्य घराघरात गाजला. त्याच्या अभिनयाचंदेखील कौतुक झालं. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटातूनही प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नुकताच त्याचा प्रहार हा चित्रपट भेटीला आला. यात तो अजमल कसाबच्या भूमिकेत दिसला. त्याच्या या भूमिकेने त्याला बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख मिळवून दिलीये. ललित आता ३९ वर्षाचा आहे. मात्र तो अजूनही सिंगल आहे. अनेक मुली त्याच्यावर फिदा असताना तो मात्र लग्न करायचं नाव घेत नाहीये. एका मुलाखतीत त्याने यामागचं कारण सांगितलं होतं.