

Super Duper Movie Trailer Out
esakal
Marathi Entertainment News : यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार बघता यावा अशा धमाल मनोरंजनाची मेजवानी असणाऱ्या सुपर डूपर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नावाप्रमाणेच हा ट्रेलरही सुपर डुपर झाला असून यात एकमेकांवर कुरघोडी करणारे एकाहून एक मातब्बर कलाकार बघून हा चित्रपट पैसा वसूल करणारा ठरेल अशी प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाइन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित तथा समीर आशा पाटील दिग्दर्शित सुपर डुपर हा चित्रपट येत्या ३ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.