lalita pawar
esakal
Lalita Pawar’s Tragic Life: भारतीय सिनेसृष्टीतील दृष्ट सासू आणि रामायणमधील मंथरा म्हणून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री ललिता पवार यांचा अभिनयाचा प्रवास खुप मोठा आणि वैविध्यपूर्ण होता. त्यांनी हिंदी, मराठी, गुजराती चित्रपटांमध्ये ७०० पेक्षा जास्त सिनेमामध्ये काम केलय. अभिनयात ७० वर्षांच्या करिअरसाठी त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं. त्यांना अनाडी सिनेमातील कामासाठी फिल्मफेअर पुरस्कारही देण्यात आला.