LARA DUTTA VIDEO
esakal
LARA DUTTA STUCK IN DUBAI AMID ISRAEL–IRAN CONFLICT: अमेरिका आणि इस्त्रायल यांनी इराणविरोधात जोरदार हल्ले केलेत. यात इराणने देखील इस्त्रायलच्या कतार, कुवेत, बहारिन यांच्या लष्कारी तळावर प्रतिहल्ला केलाय. दरम्यान यासगळ्या घटनेनंतर जगभरातील विमान कंपन्यांनी आशियातील विमानसेवा स्थगित केलीय. तसंच या परिस्थितीत दुबईची उड्डाणं सुद्धा रद्द करण्यात आलीत. ज्यामुळे अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले होते. यामध्ये काही सेलिब्रिटी सुद्धा अडकल्याची माहिती आहे. लारा दत्ता देखील दुबईत अडकली आहे. दरम्यान इन्स्टाग्रामवर तिने व्हिडिओ शेअर करत तिथल्या परिस्थितीबद्दल सांगितलं. यावेळी तिला अश्रू देखील अनावर झाले.