लक्ष्मी निवास मालिकेत दिवसेंदिवस नवे नवे ट्विस्ट येताना पहायला मिळत होते. 'लक्ष्मी निवास' ही मालिका नेहमीच चर्चेत असते. मालिकेतील अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जयंत जान्हवीच्या अनेक किस्स्यांना सोशल मीडियावर चांगलच ट्रोल केलं जातं. दरम्यान आता मालिकेत असा ट्विस्ट आलाय की नेटकऱ्यांनी सुद्धा या मालिकेच्या प्रोमोला पसंती दाखवली आहे.