लक्ष्मीच्या पाऊलांनी या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता आता मराठी सिनेमात पदार्पण करतोय.छोट्या पडद्यावरच्या लोकप्रियतेनंतर तो मोठ्या पडद्यावरही झळकणार आहे.त्याच्या आगामी सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे..Marathi Entertainment News : मराठी मालिकांमधील कलाकार हे सिनेमातील कलाकारांपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत असं म्हणावं लागेल. काही कलाकारांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये खूप जास्त आहे. मराठी मालिकेमुळे लोकप्रिय झालेला एक अभिनेता आता मराठी सिनेमातही दिसणार आहे. कोण आहे हा कलाकार जाणून घेऊया. .लवकरच अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला परिणीती सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेतील सगळ्यांचा लाडका अद्वैत म्हणजेच अभिनेता अक्षर कोठारी मुख्य भूमिकेतुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. .या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, अक्षरच्या संवेदनशील नजरेतून झळकणारी ही झलक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. या चित्रपटात अक्षरसोबत सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष या मराठी चित्रपटसृष्टीतील दोन अत्यंत प्रतिभावान अभिनेत्रींची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. .या भूमिकेबद्दल अक्षर कोठारी म्हणतो, '' 'परिणती’ माझ्यासाठी केवळ एक चित्रपट नाही, तर एक अनुभव आहे. जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली, तेव्हा त्या पात्राच्या खोलात जाण्याची आणि त्याचा प्रवास अनुभवण्याची खूप तीव्र इच्छा झाली. अमृता आणि सोनालीसोबत काम करणं ही एक मोठी शाळा होती. या चित्रपटाने मला कलाकार म्हणून अधिक समृद्ध केलं आहे.”.चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणतात, “‘परिणती’ ही दोन स्त्रियांभोवती फिरणारी गोष्ट असली, तरी ती आपल्या सर्वांच्या आतल्या लढ्यांची, शोधांची कहाणी आहे. दोन परस्परभिन्न स्त्रिया एका वळणावर एकमेकींच्या आयुष्यात येतात आणि त्यांच्या नात्यातून एक नवा अध्याय सुरू होतो. सोनाली आणि अमृता यांसह अक्षरने ही त्याच्या भूमिकेला एक वेगळी उंची दिली आहे.'' .पीएच फिल्म्स, फिनिक्स फिल्म्स आणि इनसिंक मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित या चित्रपटाचे निर्माते पराग मेहता आणि हर्ष नरूला असून, अमित डोगरा, मोना नरूला, रुही माने, आशिष त्रिवेदी, शारदा नरूला, मनोज जैन, मोहित लालवानी, कांचन शाह आणि शांता जैन हे सहनिर्माते म्हणून सहभागी आहेत. अक्षय बाळसराफ यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत..FAQs : 1. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील कोणता अभिनेता आता सिनेमात दिसणार आहे?→ मालिकेतील प्रमुख अभिनेता (नाव लवकरच जाहीर होईल) लवकरच मराठी सिनेमातून पदार्पण करतोय.2. हा अभिनेता आधी कोणत्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे?→ तो ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील भूमिकेसाठी ओळखला जातो.3. हा नवा सिनेमा कधी प्रदर्शित होणार आहे?→ सिनेमाची अधिकृत रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.4. सिनेमाचं नाव काय आहे?→ सिनेमाचं नाव लवकरच निर्मात्यांकडून जाहीर केलं जाणार आहे.5. या अभिनेत्याला प्रेक्षकांकडून किती प्रतिसाद मिळतो?→ प्रेक्षकांमध्ये त्याची लोकप्रियता खूप असून सोशल मीडियावरही त्याची फॅन फॉलोइंग मोठी आहे..Tharal Tar Mag : प्रियाला जेलमध्ये पाठवल्यानंतर सायलीला मिळाली धमकी; प्रोमो पाहून प्रेक्षकही शॉक !.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.