

chetan dalvi on laxmikant berde
esakal
निधनानंतरही मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे एकमेव अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रत्येक भूमिका जिवंत केली. गिरगावच्या मंडळात गणेशोत्सवाला नृत्य करणारा, नाटिका सादर करणारा मुलगा इतका मोठा कलाकार होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आपला नाटकाचा प्रवास अविरतपणे सुरू ठेवत लक्ष्मीकांत यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. त्यांचे चित्रपट गाजले त्यापेक्षाही त्यांची नाटकं गाजली. याच नाटकादरम्यान त्यांना अनेक जीवाला जीव देणारी मित्रमंडळी भेटली. त्यातील एक अभिनेते चेतन दळवी यांनी त्याचा एक किस्सा सांगितला आहे जेव्हा लक्ष्मीकांत यांना राग आलेला.