धक-धक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री माधुरी दीक्षित आज 58 वर्षाची झाली आहे. 90 च्या दशकामध्ये माधुरीचं नाव प्रत्येकांच्या तोडांत असायचं. त्या काळात माधुरी दीक्षित यांचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरत होता. परंतु करिअरच्या सुरुवातील माधुरीला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. एकदा तर शुटिंग संपल्यानंतर ती रडत निघून गेली.