Madhuri Dixit Breaks Silence on Bold Scene:
esakal
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने तिच्या अभिनयाच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले. ती आज देखील चिरतरुण दिसते. परंतु तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. कुटुंबातून येणाऱ्या टोमण्यामुळं तिने स्वत: सिनेमापासून दूर हाण्याचा निर्णय घेतला. परंतु अभिनयाच्या करिअरकडे लक्ष देत चार वर्षाच्या अभिनयाच्या अथक प्रयत्नानंतर माधुरीचा 1988मध्ये प्रदर्शित झालेला तेजाब चित्रपट हिट झाला. या चित्रपटातील मोहिनी रातोरात स्टार झाली. परंतु माधुरीकडे अशा काही मागण्या झाल्या की, ती अक्षरश: रडायला आली होती.