MADHURI DIXIT HUSBAND DR SHRIRAM NENE
esakal
WHY SHRIRAM NENE DID NOT KNOW MADHURI DIXIT WAS A SUPERSTAR: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा मोठा चाहतावर्ग आहे. ९० च्या दशकामध्ये माधुरीची मोठी क्रेझ होती. अनेक सिनेमे माधुरीशिवाय पूर्ण होत नसायचे. परंतु लग्नानंतर माधुरी अभिनयाचं करिअर सोडून अमेरिकेत स्थायिक झाली. डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत तिने विवाह केला. काही वर्षांनंतर माधुरी नेनेंसोबत पुन्हा भारतात परतली. दरम्यान जेव्हा लग्न झालं तेव्हा माधुरी एवढी मोठी स्टार अभिनेत्री आहे, हे श्रीराम नेने यांना माहिती सुद्धा नव्हतं. याबद्दल एक किस्सा त्यांनी एका मुलाखतीत शेअर केलाय.