

Madhuri Dixit Home Nameplate
sakal
MADHURI DIXIT LATEST BOLLYWOOD ENTERTAINMENT NEWS: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित बऱ्याचदा आपला अभिनय, एखादा लूक याच्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. सध्याही ती चर्चेचा विषय आहे, मात्र कोणत्या चित्रपट किंवा रेड कार्पेट लूकमुळे नाही, तर तिच्या घराच्या दारावरील एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.
दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान हिने तिच्या युट्यूब शोनिमित्त माधुरीच्या घराला भेट दिली होती. त्यावेळी तिने माधुरीच्या घराची एक छोटीशी झलक आपल्या युट्यूब व्हिडीओमधून चाहत्यांना दाखवली. यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते घराच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या नेमप्लेटने!