VIDEO: 'मला जाऊ द्या ना घरी..' धकधक गर्ल माधुरीचा वाजले की बारा वर भन्नाट डान्स पण वैष्णवी पाटीलचं होतंय कौतुक, काय आहे कारण ?

Madhuri Dixit: माधुरी ही अजय-अतुलच्या 'वाजले की बारा' या गाण्यावर थिरकली आहे. तिच्या डान्सच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
Madhuri Dixit
Madhuri Dixitesakal

Madhuri Dixit: अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ही तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. माधुरी ही सध्या डान्स दिवाने-4 (Dance Deewane 4) या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे. या कार्यक्रमामध्ये माधुरी ही अनेक वेळा परफॉर्म करते. नुकतीच माधुरी ही वाजले की बारा या गाण्यावर थिरकली. तिच्या या गाण्यावर डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माधुरीचा व्हिडीओ व्हायरल

वाजले की बारा या गाण्यावरील माधुरीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त वैष्णवी पाटीलनं शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये माधुरी ही वैष्णवीसोबत डान्स करताना दिसत आहे. वैष्णवीनं व्हिडीओला कॅप्शन दिलं, "आंतरराष्ट्रीय नृत्य दिन माझ्या माधुरी मॅडमसोबत साजरा केला. त्या मला प्रेरणा देतात"

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

माधुरी आणि वैष्णवी पाटील यांच्या डान्सच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं व्हिडीओला कमेंट केली, माधुरीचे हावभाव जबरदस्त आहेत. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "दोघींनी खूप छान डान्स केला." अनेकांनी माधुरीसोबतच वैष्णवीचं देखील कौतुक केलं आहे. व्हिडीओमधील वैष्णवीच्या डान्स स्टाईलचं अनेकजण कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ:

Madhuri Dixit
Madhuri Dixit: "दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ..."; मराठी गाण्यवर धकधक गर्लचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

माधुरी आणि वैष्णवीचा खास लूक

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या डान्सच्या व्हिडीओमध्ये माधुरी आणि वैष्णवी या दोघी खास लूकमध्ये दिसत आहे. माधुरी ही हिरवी साडी, मोकळे केस आणि नाकात नथ अशा लूकमध्ये दिसत आहे तर वैष्णवी ही गुलाबी आणि काळ्या रंगाची नऊवारी साडी अन् गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे.

डान्स दिवाने-4 या कार्यक्रमामध्ये विविध सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री करिष्मा कपूरनं या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी करिष्मा आणि माधुरी यांनी ‘चक धूम धूम’ या गाण्यावर डान्स केला.

Madhuri Dixit
Madhuri Dixit and Karisma Kapoor Dance : माधुरी दीक्षित-करिश्मा; ‘चक धूम धूम’वर थिरकल्‍या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com