MADHURI DIXIT GET MARRIED SECRETLY
esakal
MADHURI DIXIT AND SHRIRAM NENE WEDDING STORY: अभिनेत्री माधुरी दीक्षितचा मोठा चाहतावर्ग आहे. माधुरीने आजवर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. ९० च्या दशकात सर्वत्र माधुरीचीच क्रेझ पाहायला मिळायची. अशातच आता माधुरीने तिच्या लग्नाचा किस्सा शेअर केला आहे. माधुरीचं लग्न झालं, तेव्हा तिच्या अनेक चाहत्यांना दुःख झालं होतं. माधुरीचा विवाहसोहळा अमेरिकेत तिच्या भावाच्या घरी पार पडला होता. ‘कोण होणार करोडपती’ या शोमध्ये तिने आपल्या लग्नाचा हा खास किस्सा सांगितला.