

‘Kon Honar Crorepati’ Announces New Season With Madhuri Dixit as Host
ESakal
मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर आधारित लोकप्रिय कार्यक्रम 'कोण होणार करोडपती'च्या नव्या पर्वाची घोषणा करत असून या पर्वातून महाराष्ट्राची लाडकी लेक आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित अभिनेत्री माधुरी दीक्षित सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्या येण्यामुळे या लोकप्रिय कार्यक्रमात एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे आणि नव्या विचारांचा, नव्या ऊर्जेचा आणि नव्या स्वप्नांचा प्रवास सुरू होणार आहे कारण 'आता खेळ बदलणार'...