
Bollywood News : बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने नुकतीच एका टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात मुलाखत दिली. याच दरम्यान बाबा रामदेव आणि बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी तिच्यावर टीका केली. अभिनेत्रीने सांगितलं कि, रामदेव बाबांना महाकाल आणि महाकालीची भीती वाटली पाहिजे. तर धीरेंद्र शास्त्रीविषयी ती म्हणाली कि, जितकी धीरेंद्र शास्त्रींचं जितकं वय आहे तितकी वर्षं मी तपश्चर्या केली आहे. दरम्यान ममताला महामंडलेश्वर पदवी दिल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ही पदवी काढून घेण्यात आली.