
Bollywood Entertainment News : माजी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीचं आयुष्य कायम वादग्रस्त राहिलं आहे. एकेकाळी बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख असणारी ममता नंतर ड्रग्स, अंडरवर्ल्डच्या जाळ्यात अडकली. पण नंतर तिची यातून निर्दोष सुटका झाली. तर आता ती पुन्हा वादाच्या जाळ्यात अडकली आहे ती महाकुंभ मध्ये तिला मिळालेल्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदवीमुळे. जी नंतर काढूनही घेण्यात आली. हा वाद टोकाला पोहोचला असतानाच ममताविषयीच्या जुन्या वादग्रस्त गोष्टीही समोर आल्या आहेत.