
हल्ली रंगभूमीवर नवे विषय सादर होत असतानाच जुन्या श्रेष्ठ नाटकांचे पुनरुज्जीवनही होत आहे.
सतीश आळेकर लिखित 'महापूर' हे नाटक आधुनिक मराठी रंगभूमीचा एक महत्त्वाचा टप्पा मानलं जातं.
आता हे नाटक सुवर्ण महोत्सवी वर्षात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.