Maharashtra Farmer Wins ₹50 Lakh on KBC Without Using Lifelines
esakal
सध्या महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालय. मराठवाड्यासह सोलापूर, संभाजीनगरमध्ये पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान केलय. शेतकऱ्याचं होणारं नुकसान पाहून प्रत्येकजण हळ करताना दिसतोय. अशातच शेतकऱ्यांबाबत एक आनंदाची बातमी समोर आलीय. एका शेतकऱ्याने कौन बनेगा करोडपती या शोमध्ये पन्नास लाख रुपये जिंकले आहे. त्याचा केबीसीमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.