Bye Bye MHJ! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' घेणार निरोप; अभिनेत्रीने मंचावरून शेअर केले फोटो

Maharashtrachi Hasyajatra Off Air: लोकप्रिय मराठी कार्यक्रम महाराष्ट्राची हास्यजत्रा लवकरच निरोप घेणार असल्याचं बोललं जातंय.
maharashtrachi hasyajatra
maharashtrachi hasyajatra esakal
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ज्याने मराठी विनोदवीरांना हक्काचं स्थान मिळवून दिलं, ज्याने या विनोदवीरांना स्वतःची ओळख निर्माण करण्याचं बळ दिलं, संधी दिली, ज्या कार्यक्रमाने प्रेक्षकांना करोना काळातही हसायला भाग पाडलं तो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. मात्र आता प्रेक्षकांचा हा लाडका कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. टीममधील एका अभिनेत्रीने केलेल्या पोस्टमुळे ही चर्चा रंगली आहे. लवकरच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ऑफ एअर जाणार आहे.

Maharashtrachi Hasyajatra
Maharashtrachi Hasyajatra esakal

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ने अनेक नवख्या कलाकारांना संधी दिली. हा कार्यक्रम पहिल्यांदा २२ ऑगस्ट २०१८ रोजी प्रक्षेपित करण्यात आला. मध्यंतरी या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र काही महिन्यांनी पुन्हा याचं प्रक्षेपण सुरू करण्यात आलं. आता अखेर पुन्हा एकदा हा कार्यक्रम ऑफ एअर जाणार आहे. अभिनेत्री प्रियदर्शनी जाधव हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. एका पोस्टमध्ये तिने वनिता खरातसोबतचा एक एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने 'शेवटचं शेड्युल असं लिहिलं आहे. त्यानंतर तिने मंचावरील पायऱ्यांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात तिने डिअर महाराष्ट्राची हास्यजत्रा तुझी आठवण येईल असं लिहिलं आहे.

Maharashtrachi Hasyajatra
Maharashtrachi Hasyajatra esakal

तर शेवटी तिने मंचाचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चा बोर्ड दिसतोय. वनिता खरातने देखील असे फोटो शेअर केले आहेत. आता या फोटोंमुळे महाराष्ट्राची हास्यजत्रा प्रेक्षकांचा अखेर निरोप घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या कार्यक्रमाने नम्रता संभेराव, वनिता खरात, प्रियदर्शिनी जाधव, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब, समीर चौघुले, ओंकार भोजने, गौरव मोरे असे अनेक अवलिया कलाकार महाराष्ट्र्राला दिले. हा कार्यक्रम पुन्हा कधी सुरू होणार याबद्दलही आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.

maharashtrachi hasyajatra
प्रशस्त जागा, समोर समुद्र, कार्तिक आर्यन रेंटवर देतोय जुहूमधील घर; पण भाडं वाचून म्हणाल नको रे बाबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com