अहमदाबाद विमान अपघातात अनेकांनी जीव गमावले. प्राण गमावलेल्यांचं कुटुंबीय अजूनही सदम्यात आहे. डीएनए तपासणीद्वारे अनेकांचे मृतदेह पटवण्याचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान अशातच आता एक नवीन बातमी समोर येत आहे. 34 वर्षीय महेश कालावाडिया हे अहमदबाद विमान अपघातानंतर गायब आहे. त्यांचं कुटुंबीय त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मेहशच्या कुटुंबियांनी रुग्णालय, शवगृह आणि पोलीस ठाण्यात चौकशी केली. परंतु महेशचा कुठेच पत्ता लागल नाहीय.