Aamir Khan : महेश कोठारे होते म्हणून 'राजा हिंदुस्थानी'मधला आमिर- करिश्माचा किस पडद्यावर दिसला, काय घडलं नेमकं ?

Aamir Khan & Mahesh Kothare friendship story : आमिर खानच्या गाजलेल्या 'राजा हिंदुस्थानी' सिनेमातील त्याचा आणि करिश्माचा किसिंग सीन खूप गाजला. पण हा सीन सिनेमात दिसण्यासाठी महेश कोठारे कारणीभूत आहेत. जाणून घेऊया हा किस्सा.
Aamir Khan & Mahesh Kothare friendship
Aamir Khan & Mahesh Kothare friendshipEsakal

Raja Hindustani : मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीचे निर्माते, अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचं सिनेविश्वातील योगदान खूप मोठं आहे. आजवर त्यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि अनेक सिनेमांची निर्मितीही केली आहे.

बॉलिवूडमध्ये बालकलाकार म्हणून पदार्पण करणाऱ्या महेश यांची आज अनेक बॉलिवूड कलाकारांशी खास दोस्ती आहे. त्यातीलच त्यांचा एक खास दोस्त म्हणजे बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महेश यांनी आमिरच्या राजा हिंदुस्थानी सिनेमाचा एक खास किस्सा शेअर केला.

महेश यांच्यामुळे राजा हिंदुस्थानीमधील 'तो' सीन दिसला

महेश कोठारे यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमधील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी त्यांची आमिर खानबरोबरची एक खास आठवण शेअर केली. ते म्हणाले कि, " 'लो में आ गया' या माझ्या सिनेमात मला आमिरला घ्यायचं होतं आणि म्हणून मी त्याला भेटलो. त्याला मी माझा 'मासूम' सिनेमा दाखवला. त्याला तो खूप आवडला. मी सिनेमाबद्दल सांगितलं तेव्हा तो मला म्हणाला कि तुझी स्क्रिप्ट आण आपण बघूया. त्याचवेळी त्याचा राजा हिंदुस्थानी सिनेमा रिलीज होणार होता आणि त्यावेळी मी सेन्सॉर बोर्डावर होतो. हे त्याला समजताच आमिरने मला विनंती केली कि. त्याचा सिनेमातील किसिंग सीन कट नाही झाला पाहिजे. मी ते मान्य केलं आणि सेन्सॉर बोर्डातील माझ्या सहकाऱ्यांना माझ्या स्टाईलने समजावलं आणि तो सीन कट झाला नाही."

Aamir Khan & Mahesh Kothare friendship
Mahesh Kothare: महेश कोठारे यांना मातृशोक, ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे (जेनमा) यांचे निधन

पुढे ते म्हणाले,"त्यानंतर आम्ही परत दोन दिवसांनी भेटलो तेव्हा आमिर मला म्हणाला कि तो माझा सिनेमा करू शकत नाही.मला वाईट वाटलं आणि मी त्याला म्हंटलं कि तू नाही तर मी हा सिनेमा करत नाही. त्याने मला तेव्हा समजावण्याचा प्रयत्न केला कि असं मी करू नये उलट तो मला स्क्रिप्टमध्ये मदतही करणार होता. पण मी नकार दिला. मला वाटतं मी ही चूक केली. "

Aamir Khan & Mahesh Kothare friendship
Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com