
Marathi Entertainment News : निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या सर्वाधिक प्रशंसा वाट्याला आलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या- संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या अभिनयाने नटलेल्या 'वध' या चित्रपटाचे मराठी रूपांतर ‘देवमाणूस’मध्ये पुन्हा मांडण्यात आले आहे. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'वध' चित्रपटाच्या झालेल्या कौतुकानंतर, निर्मात्यांना या चित्रपटाचे अस्सल मराठमोळे रूपांतर करण्याची संधी मिळाली- जी भाषांतराच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने मराठी घराघरांत घडणारी कथा बनली आहे.