मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने प्रत्येकांच्या मनात अधिराज्य गाजवणारे महेश मांजरेकर यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. बॉलीवूडसह मराठी सिनेसृष्टीत त्यांनी आपली एक वेगळी झाप पाडली. परंतु तुम्हाला माहिती आहे का? अभिनय श्रेत्रात आपला ठसा उमटवणारे महेश मांजकरांनी खास गर्लफ्रेंडसाठी बँकेत नोकरी केली होती. परंतु ब्रेकअप झालं आणि ते आवडीच्या क्षेत्रात पोहचले.