बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेस आणि डान्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या डान्सचे अनेक चाहते आहेत. तर अनेक जण तिच्या फिटनेस टिप्स ट्राय करत असतात. एवढ्या वयातही ती चिरतरुण दिसते. अनेक वेळा मलायका रियालिटी शोमध्ये जज म्हणून पहायला मिळते. परंतु एका शोमध्ये ती जज म्हणून आली असताना एका स्पर्धकाने असं काही कृत्य केलं की, ज्यावर मलायका खूप भडलकी.