मलायका आरोराने अरबाजच्या लेकीला दिल्या शुभेच्छा? स्टोरी केली शेअर, नेटकरी म्हणाले...'हिला झालं तरी काय'

Malaika Arora Congratulates Arbaaz Khan on His Baby Girl Sipara: सध्या सोशल मीडियावर मलायकाने अरबाजला शुभेच्छा दिल्याच्या चर्चा रंगत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्या स्टोरीवरून तिने अरबाजला शुभेच्छा दिल्याचं बोललं जातय.
Malaika Arora Congratulates Arbaaz Khan on His Baby Girl Sipara

Malaika Arora Congratulates Arbaaz Khan on His Baby Girl Sipara

esakal

Updated on

अरबाजला दुसरी पत्नी शुरापासून एक गोंडस मुलगी झाली आहे. नुकतच त्याच्या मुलीचं बारसं पार पडलं. परंतु या सगळ्यात चर्चा रंगली ती मलायकाची. कारण मलायकाने पुर्वाश्रमीचा पती अरबाजच्या लेकीसाठी एक खास पोस्ट शेअर केल्याचं बोललं जातय. अरबाज आणि मलायकाचा 8 वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी अरबाजने मेकअप आर्टिस्ट शुरासोबत लग्नगाठ बांधली. अरबाजला मलायकापासून एक 22 वर्षांचा मुलगा सुद्धा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com