

manjiri oak
ESAKA;
छोटा आणि मोठा पडदा गाजवणारा लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक आणि निर्माती मंजिरी ओक यांच्या मोठ्या मुलाचा म्हणजेच सार्थकचा महिन्याभरापूर्वी साखरपुडा झाला. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने या साखरपुड्याची फोटो शेअर केले होते. आम्हाला याचा फार गाजावाजा करायचा नव्हता असं मंजिरी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. प्रसाद आणि मंजिरी यांना इतका मोठा मुलगा आहे हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता एका मुलाखतीत मंजिरीने त्यांच्या साखरपुड्यातला प्रसंग सांगितलाय.